ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची 26 डिसेंबर रोजी जयंती असते त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने विशेष डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. त्यांनी आयुष्यभर केलेले समाजकार्य आणि कुष्ठरोग्यांची सेवा या सगळ्या गोष्टींचा आढावा या डुडलमध्ये दाखवण्यात आला आहे. आपले सर्व आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी वेचणाऱ्या बाबा आमटेंना गुगलने ही अनोखी मानवंदना दिली आहे.
डॉ. मुरलीधर देवीदास आमटे हे बाबा आमटेंचे खरे नाव. चंद्रपुरात कुष्ठरोग्यांना आपलं म्हणणारा आनंदवन हा आश्रम त्यांनी सुरु केला. तसेच नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांचा प्रमुख सहभाग होता. बाबा आमटेंच्या समाजकार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात जाहली जेव्हा त्यांनी एका कुष्ठरोग्याला पावसात भिजताना पाहिलं. त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं. त्यांनी एक क्षण असा विचार केला की त्या कुष्ठरोग्याच्या जागी जर मी असतो तर? आणि दुसऱ्या क्षणी बाबा त्या माणसाला घेऊन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आपलं आयुष्य आहे. त्यांच्यासाठीच जगायचं असा ध्यासच घेतला आणि आजही त्यांचे हे कार्य त्यांच्या पुढच्या पिढीकडून देखील अविरत सुरु आहे.
बाबा आमटे यांचे समाजकार्य खूप महान आहे. समाजाला नवी दिशा देणाऱ्या माणसाच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार केले आहे.